परिसर

उत्तर प्रदेश

A multilingual Pune local news platform powered by a CMS-based publishing workflow.

Crime_UP_Noidasahir shaikh

जत्रेहून परतले, नूडल्स खाल्ले अन् कायमचे झोपले! पाच मृत्यूंमागचं गूढ आणखी गडद

ग्रेटर नोएडामध्ये पती-पत्नी आणि तीन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय होता. मात्र, नूडल्समध्ये जाणीवपूर्वक विष मिसळल्याची शक्यता समोर आली आहे. मृत महेश यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या ऑडिओ नोटमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, संपत्तीच्या वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

Ram Temple_New CEOSukanya Perane

एअर मार्शल जितेंद्र मिश्रा राम मंदिराचे पहिले CEO; तीन वर्षे सांभाळणार मंदिराच्या प्रशासनाची धुरा

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या व्यवस्थापनात मोठा बदल करण्यात आला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची मंदिराचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. तब्बल 5500 हून अधिक अर्जांमधून 18 उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यात आल्यानंतर जितेंद्र मिश्रा यांची निवड झाली. कारगिल युद्ध आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मिश्रा यांच्यासमोर आता राम मंदिराचा प्रशासकीय, आर्थिक आणि कायदेशीर कारभार अधिक पारदर्शकपणे हाताळण्याचे आव्हान असणार आहे.

hardoi caseSakshi Megha Prabhu

प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट! पत्नीच्या वडील, काका आणि भावाकडून जावयाची हत्या; ७ महिन्यांच्या बाळाच्या डोळ्यांसमोर संसार उद्ध्वस्त

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात प्रेमविवाह केलेल्या २८ वर्षीय विवेक कनौजिया या ई-रिक्षा चालकाची पत्नीच्या कुटुंबीयांनी काठ्यांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवेक आणि पूनम यांनी २०२४ मध्ये कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केला होता. त्यानंतर दोघे नोएडा येथे राहत होते. सात महिन्यांच्या मुलासह गावी परतल्यानंतर पत्नीच्या वडील, काका आणि भावांनी विवेकवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

उत्तर प्रदेश | News Network 360