स्रोत

Sahir Shaikh

Sahir Shaikh कडील सर्व बातम्या

accidentSahir Shaikh

पुण्यात अपघात मृत्यू प्रकरणात १ कोटी १८ लाखांची नुकसानभरपाई; मोटार अपघात दावा प्राधिकरणाचा मोठा निर्णय

पुण्यात २०२३ मध्ये झालेल्या भीषण रस्ता अपघातात कर सल्लागार मकरंद जिंदे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या नुकसानभरपाईच्या दाव्यावर सुनावणी करताना मोटार अपघात दावा प्राधिकरणाने १ कोटी १८ लाख १६ हजार ५५६ रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

सोन्या मनोहर थोरात  imagessahir shaikh

खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी कात्रज चौकातून अटकेत; पुणे गुन्हे शाखेची कारवाई

खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यात गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या सोहम ऊर्फ सोन्या मनोहर थोरात (वय २१) याला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-२ने कात्रज चौकातून अटक केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत संबंधित गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

महाराष्ट्रात रिक्षा imagessahir shaikh

पुण्यात ७२२ अमराठी रिक्षाचालकांनी घेतले मराठीचे धडे; प्रशिक्षणानंतर मिळाले प्रमाणपत्र

पुण्यात अमराठी भाषिक रिक्षाचालकांना प्रवाशांशी सहज संवाद साधता यावा, यासाठी राबवलेल्या मराठी भाषा प्रशिक्षण उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. ७२२ रिक्षाचालकांनी प्रशिक्षण पूर्ण करून तोंडी परीक्षा उत्तीर्ण केली असून, १७ ऑगस्ट रोजी पुणे RTOमध्ये त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आणखी ३५० हून अधिक रिक्षाचालकांना प्रशिक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

गुरुनानक डेअरी imagessahir shaikh

FDAला न्यायालयाचा दणका! गुरुनानक डेअरीचा परवाना निलंबन रद्द; ५ लाखांची नुकसानभरपाई

पुण्यातील गुरुनानक डेअरी अँड स्वीट्सचा FDAने १२ जून रोजी निलंबित केलेला परवाना न्यायालयाने रद्द केला आहे. तपासणीत दुकानाकडून ९८ टक्के नियमांचे पालन होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही परवाना निलंबित ठेवण्यात आल्याने न्यायालयाने FDAच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. तसेच, कारवाईमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी दुकान मालकाला ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Bharati Vidyapith NewsSahir Shaikh

महिला शिपायासोबत गैरवर्तन भोवले; पुण्यात पोलीस हवालदार तडकाफडकी निलंबित

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात महिला शिपायासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप झाल्याने पोलीस हवालदारावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली. किरण देशमुख असे संबंधित हवालदाराचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

BJP NewsSahir Shaikh

रवींद्र धंगेकर यांच्या प्रभावक्षेत्रात भाजपसाठी नवे स्थानिक बळ ?* मनसे चे प्रल्हाद गवळी यांचा भाजप प्रवेश.

प्रल्हाद गवळी यांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. महिला वर्गातील ‘बहिणींचा लाडका भाऊ’ ही प्रतिमा, सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांमधून निर्माण झालेला जनसंपर्क आणि जुन्या पुण्यातील स्थानिक नेटवर्क भाजपसाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे पूर्व पुण्यातील आगामी राजकीय समीकरणांमध्ये गवळी यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांचे आंदोलनSahir Shaikh

पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे तीव्र धरणे आंदोलन; प्रवेश पूर्ववत करण्यासह संचालकांच्या राजीनाम्याची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील आदिवासी आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे रद्द केलेले प्रवेश पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी RPI आठवले गटाच्या विद्यार्थी संघटनेने धरणे आंदोलन केले. केंद्राचे संचालक आणि समन्वयक यांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलकांनी केली.

gunhe shakhasahir shaikh

पुण्यात सराईत गुन्हेगारांकडून पिस्टलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; गुन्हे शाखा युनिट २ची कारवाई

पुणे गुन्हे शाखा युनिट २ने आंबेगाव परिसरात कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मॅग्झीनसह एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, मुद्देमालाची किंमत सुमारे ४० हजार रुपये आहे. आरोपींविरुद्ध आंबेगाव पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तिघांविरुद्ध यापूर्वीही पुणे जिल्ह्यात विविध शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.

ravindra dhanekarSahir Shaikh

Ravindra Dhangekar : 'भाजपने जाब विचारावा, अन्यथा चंद्रकांत पाटील यांच्याबाबतचे कथित पुरावे समोर आणू'; धंगेकरांचा इशारा

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावरून काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर निशाणा साधत संबंधितांना जाब विचारण्याची मागणी केली आहे. तसेच, कारवाई न झाल्यास चंद्रकांत पाटील यांच्याबाबतचे कथित पुरावे सार्वजनिक करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मात्र, या दाव्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

trafficking woman imagessahir shaikh

परदेशात नोकरीचे आमिष अन् ११ लाखांची फसवणूक; पोर्तुगालमध्ये तरुणीला वेश्या व्यवसायासाठी विकल्याचा धक्कादायक आरोप

परदेशात सुपरमार्केटमध्ये नोकरीचे आमिष दाखवत नागपूरच्या २८ वर्षीय महिलेची ११ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोर्तुगालमध्ये नेऊन तिला वेश्या व्यवसायासाठी भाग पाडल्याचा आरोप करत महिलेने भारतात परतल्यानंतर पुण्याच्या विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुण्यातील एजंटांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मानवी तस्करीच्या रॅकेटचा पोलीस तपास करत आहेत.

lonavala Imagesahir shaikh

लोणावळा शहर पोलिसांची मोठी कामगिरी; २.२१ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

लोणावळा शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, Google Pay व्यवहार आणि गुप्त माहितीच्या आधारे चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी हरिदास बाळू कोळेकर याला मुंबईतील मानपाडा (कल्याण) येथून अटक करण्यात आली. आरोपीकडून एचपी लॅपटॉप, ॲपलचे दोन मोबाईल, स्मार्ट वॉच, एअरपॉड्स, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील तपास सुरू आहे.

रमेश परदेशीsahir shaikh

"प्रभात रोडचा 'लक्ष्मी रोड' होण्याची भीती; अभिनेता रमेश परदेशी यांची अनियंत्रित शहरीकरणावर संतप्त पोस्ट"

अभिनेते रमेश परदेशी (पिठ्या भाई) यांनी फेसबुक पोस्टद्वारे पुण्यातील अनियंत्रित शहरीकरण आणि वाढत्या व्यावसायिकीकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रभात रोड आणि भांडारकर रोडसारख्या शांत परिसरांचे स्वरूप झपाट्याने बदलत असल्याची खंत व्यक्त करत, रहिवासी भागात बहुमजली आणि व्यावसायिक प्रकल्पांना परवानगी देण्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वाढती लोकसंख्या, संभाव्य पाणीटंचाई, झाडांची घट आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांकडे लक्ष वेधत त्यांनी नियोजनबद्ध विकास आणि कठोर प्रशासनिक उपाययोजनांची मागणी केली.

पोर्शे प्रकरण Imagesahir shaikh

कल्याणीनगर पोर्शे प्रकरणात मोठा दिलासा; रक्तनमुने बदल प्रकरणातील शिपाईला जामीन

पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपातील ससून रुग्णालयातील शिपाई अतुल नामदेव घटकांबळे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयानंतर या बहुचर्चित प्रकरणातील सर्व 10 आरोपींना जामीन मिळाला असून, मुख्य खटल्याची सुनावणी मात्र न्यायालयात सुरू राहणार आहे.

हेमंत बागुल Imagesahir shaikh

हेमंत बागुल यांची युवासेना पुणे महानगर अध्यक्षपदी नियुक्ती

पुणे शहरातील युवासेना अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेनेने आर्किटेक्ट आणि उच्चशिक्षित हेमंत बागुल यांची युवासेना पुणे महानगर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार झालेल्या या नियुक्तीनंतर बागुल यांनी युवकांचे संघटन, रोजगार, करिअर मार्गदर्शन आणि सामाजिक कार्याला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBI चे आरोपपत्र; NTA चे 3 विषयतज्ज्ञ, मध्यस्थ आणि कोचिंग संस्थांशी संबंधित 13 जण अडचणीत

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBI ने मोठी कारवाई करत NTA चे तीन विषयतज्ज्ञ, अनेक मध्यस्थ आणि दोन कोचिंग संस्थांशी संबंधित व्यक्तींसह एकूण 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात 360 साक्षीदार, 422 कागदपत्रे आणि 43 भौतिक पुरावे सादर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील 92 ठिकाणी छापेमारी करून तपास यंत्रणेने पेपरफुटीची संपूर्ण साखळी उघड केल्याचा दावा केला असून, सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास CBI कडून सुरू आहे.

रवींद्र धंगेकर Imagesahir shaikh

खलील शेख प्रकरणात धंगेकरांना दिलासा, बाळा शेडगेंना दणका; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

पुणे सत्र न्यायालयाने माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करून मोठा दिलासा दिला आहे. मात्र, याच प्रकरणातील सहआरोपी बाळासाहेब शेडगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. या निर्णयामुळे धंगेकरांना तपासादरम्यान अटकेपासून संरक्षण मिळाले असून, शेडगे यांच्याविरोधातील पुढील कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

nta paper leak punesahir shaikh

पेपरफुटीवरून पुण्यात विद्यार्थी रस्त्यावर; परीक्षा व्यवस्थेत बदलाची मागणी

पेपरफुटीच्या निषेधार्थ पुण्यात सलग चौथ्या दिवशी विद्यार्थी, युवक आणि नोकरदारांनी आंदोलन केले. NTA विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि शिक्षण व्यवस्थेत व्यापक बदलांची मागणी केली.

Pune महानगरपालिका  Imagesahir shaikh

पुणे महापालिकेत तृतीयपंथी समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची बैठक

पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागात तृतीयपंथी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उपआयुक्त आशा राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा, कौशल्य विकास आणि शासकीय योजनांचा लाभ तृतीयपंथी समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत चर्चा झाली. तसेच प्रशासन आणि समुदाय यांच्यात समन्वय वाढवून तृतीयपंथी समाजाच्या सक्षमीकरणासाठी ठोस कृती आराखडा राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आ

खलील शेख  Imagesahir shaikh

धंगेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

खलील शेख आत्महत्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पोलिसांनी न्यायालयात आपली भूमिका सादर न केल्यामुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने पुढील सुनावणी २२ जुलै रोजी निश्चित केली आहे. या प्रकरणी धंगेकर दाम्पत्यासह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ravindra dhangekar Imagesahir shaikh

कंत्राटदार आत्महत्या प्रकरण: माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची अटकपूर्व जामिनासाठी धाव; सर्व आरोप फेटाळले

कंत्राटदार आत्महत्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणातील सर्व आरोप फेटाळत आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

dhangekar imagesahir shaikh

"माझा थेट संबंध नाही, ही राजकीय सूडबुद्धी!" खलील शेख आत्महत्या प्रकरणी रवींद्र धंगेकरांचा पलटवार

पुणे: पुण्यातील गुलटेकडी परिसरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर खलील शेख (वय ६५) यांच्या आत्महत्येने पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ आणि सुसाईड नोटच्या आधारे स्वारगेट पोलिसांनी माजी आमदार आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्यासह एकूण १४ जणांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा (Abetment of Suicide) गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, स्वतः रवींद्र धंगेकर यांनी जाहीर प्रतिक्रिया दिली आहे, तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी चक्र फिरवली आहेत.

कंत्राटदार खलील शेख Imagesahir shaikh

पुण्यात बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या; माजी आमदार रविंद्र धंगेकर , मनसे नेते बाळा शेडगे ह्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप

कर्जबाजारीपणा, रखडलेला वक्फ बोर्डाचा प्रकल्प आणि आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओतील आरोपांमुळे प्रकरण चर्चेत