परिसर

बारामती

A multilingual Pune local news platform powered by a CMS-based publishing workflow.

yugendra-pawarSukanya Perane

अजितदादा होते तेव्हा विषय वेगळा, आता खुद्द पवार साहेब मैदानात; युगेंद्र पवारांनी दंड थोपटले, सोमेश्वरच्या निवडणुकीला रंग!

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’च्या प्रचाराचा शुभारंभ करताना युगेंद्र पवारांनी शरद पवार आता स्वतः या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचे सांगितले. कारखान्यात पारदर्शक कारभार, मेरिटवर भरती आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

sunetra-pawarSukanya Perane

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंड तापलं; सुनेत्रा पवारांच्या आव्हानाला पुरुषोत्तम जगतापांचे प्रत्युत्तर

बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या पाठिंब्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ रिंगणात उतरवणाऱ्या पुरुषोत्तम जगताप यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या आव्हानाला उत्तर देताना, “अजितदादा सभासदांच्या मनात आणि आमच्या हृदयात आहेत. त्यांचे नाव मी वापरणारच,” असे म्हटले आहे. निवडणुकीत आता तीन पॅनेल आणि 83 उमेदवार रिंगणात आहेत.

Baramati Suicide CaseSukanya Perane

19 वर्षीय तरुणाचा धक्कादायक मृत्यू; प्रेमप्रकरण उघड झाल्यानंतर नेमकं काय घडलं?

बारामतीतील सूर्यनगरी परिसरात शिक्षणासाठी राहत असलेल्या 19 वर्षीय अविष्कार ढोले या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार त्याने स्वतःवर गोळी झाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमागे एका विवाहित महिलेसोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधातून निर्माण झालेला तणाव कारणीभूत होता का, याचा पोलीस तपास करत आहेत. तरुणाकडे शस्त्र कुठून आले, याचाही शोध घेतला जात आहे.

aircraftGayatri Laxmikant mali

अजित पवारांच्या दुर्घटनेनंतर; बारामतीत दुसरी विमान दुर्घटना

बारामती एअरस्ट्रीपजवळ रविवारी एका खासगी कंपनीच्या प्रशिक्षण विमानाचे क्रॅश-लँडिंग झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे, जानेवारीत याच परिसरात झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 13 मे रोजीही बारामतीजवळ प्रशिक्षण विमानाचा अपघात झाला होता, मात्र त्यातील प्रशिक्षणार्थी पायलट सुरक्षित बचावला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर बारामती एअरस्ट्रीपवरील विमान सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Mangesh Jagtap Marriage Promise 10 Lakh Fraud Allegation ImageMadhura Manbhekar

लग्नाचे आश्वासन, 10 लाखांची फसवणूक; मंगेश जगतापांवर गंभीर आरोप

बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरोधात लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक, शारीरिक संबंध आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बारामतीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

श्रावणी कुदळेची ImageSakshi Megha Prabhu

बारामतीच्या श्रावणीचा देशभर डंका; NEET मध्ये मुलींमध्ये पहिला क्रमांक

बारामतीच्या श्रावणी कुदळेने री-नीट परीक्षेत देशात पाचवा, मुलींमध्ये पहिला आणि महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने 720 पैकी 710 गुण मिळवले असून बायोलॉजीमध्ये पूर्ण 360 गुण मिळवले. सातवीपासून नीटची तयारी करणारी श्रावणी आता दिल्लीत वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनून देशसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे. तिच्या या यशाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.