सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गावाने तीव्र दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे गाव विक्रीला काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशासन आणि राज्य सरकारने या प्रश्नाची गंभीर दखल घेतली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गावाला भेट देत पिण्याच्या पाण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांची योजना, सीना-माढा योजनेत परिसरातील गावांचा समावेश आणि तुळशी परिसरासाठी स्वतंत्र 22 कोटी रुपयांचे टेंडर काढण्याचे आश्वासन दिले आहे.
सोलापुरातील एमआयटी कॉलेजजवळ विद्यार्थ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा फौजदार चावडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका आरोपीसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि दुचाकीसह १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एका तरुणाने आपली वेगळीच समस्या मांडली. पाऊस आणि पाणी नसल्यामुळे लग्न जुळत नसल्याची व्यथा त्याने सांगितली. यावर मुख्यमंत्र्यांनी पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.
सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परिस्थिती गंभीर बनली असून सुमारे 80 टक्के पिकांचे नुकसान झाल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. पुढील 15 दिवसांत पाऊस न झाल्यास नुकसान 100 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते, असेही त्यांनी सांगितले. पंचनामे होईपर्यंत शेतकऱ्यांनी पिकांवर रोटावेटर फिरवू नये, असे आवाहन करताना त्यांनी शरद पवारांच्या प्रस्तावित दुष्काळ दौऱ्यावरही प्रतिक्रिया दिली.
राज्यात साखरेच्या दरात विक्रमी वाढ होत असताना त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांनी केला. यंदा ऊसाला ७ हजार रुपये दर मिळाल्याशिवाय ऊस तोडणी सुरू करू देणार नाही, असा इशारा त्यांनी साखर कारखानदारांना दिला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विधानसभेतही लढा उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
साखरेचा दर 75 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने शेतकरी संघटनांनी साखर कारखाने आणि व्यापाऱ्यांच्या गोदामांवर छापे टाकण्याची मागणी केली आहे. “साखर 75 रुपये आणि ऊस 3 रुपये किलो कसा चालणार?” असा सवाल नितीन बागल यांनी केला. बैठकीत 48 लाख टन साखरेच्या कथित तफावतीचाही आरोप करण्यात आला.
'सैराट' चित्रपटातील 'सल्या' या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता अरबाज शेख यांचे वडील अस्लम शेख यांचे ३० जुलै २०२६ रोजी निधन झाले. मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांच्यावर सोलापूरमधील खासगी रुग्णालयात महिनाभर उपचार सुरू होते. उपचाराचा वाढता खर्च पाहता अरबाजने सोशल मीडियावर भावनिक आवाहन करत मदत मागितली होती. त्यानंतर काही राजकीय आणि सामाजिक व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही अस्लम शेख यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांसह मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखने वडिलांच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन करणारा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. सोलापुरातील खासगी रुग्णालयावर औषधांसाठी सक्ती आणि जादा खर्चाचा आरोप करताना तो भावुक झाल्याचे दिसले. नंतर हा व्हिडीओ हटवण्यात आल्याने चर्चेला आणखी उधाण आले.
बार्शी : सोलापूर विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर बार्शी येथे आमदार दिलीप सोपल यांच्या घराच्या परिसरात जळते फटाके फेकून आग लावल्याचा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.