Gayatri Laxmikant Maliनागपुरात प्रेमत्रिकोणातून रक्तरंजित संघर्ष; दोन गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू
नागपुरातील नरेंद्रनगर परिसरात प्रेमत्रिकोणातून दोन गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणांमध्ये रस्त्यावर जोरदार हाणामारी झाली. या संघर्षात गौरव राऊतने गौरव रगडेच्या छातीत चाकूने वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी रगडेला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
