Sukanya Peraneदेवीच्या दर्शनासाठी गेले अन् मृत्यूच्या विळख्यात सापडले! कोलकात्यात १९ बळी; एका घोषणेनं घडवला अनर्थ?
कोलकात्यातील चोरबागान दुर्गापूजा मंडपात झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत १९ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. अचानक आलेला पाऊस, गर्दीच्या नियोजनातील त्रुटी आणि मंडप कोसळण्याच्या शक्यतेबाबत करण्यात आलेली घोषणा यामुळे दुर्घटना घडल्याचा संशय आहे. याप्रकरणी पूजा समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सात जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
