Sukanya Peraneलग्नासाठी प्रभाव पाडायचा होता, पण RPF वर्दीने उघड केला भांडाफोड; जळगाव रेल्वे स्थानकात तोतया महिला पोलिसाला अटक
जळगाव रेल्वे स्थानकावर स्वातंत्र्यदिनी RPFची वर्दी घालून फिरणाऱ्या एका तरुणीला सुरक्षा दलाने ताब्यात घेतले. चौकशीत ती RPF कर्मचारी नसल्याचे उघड झाले. प्राथमिक तपासात लग्नाच्या उद्देशाने स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी तिने पोलिसांची वर्दी वापरल्याचे समोर आले आहे. तिच्याकडे काही बनावट कागदपत्रेही आढळल्याने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.