Sukanya Peraneशेतकरी पैशांसाठी ताटकळले, बँक कर्मचारी वाढदिवसात रमले! शेगावच्या बँकेत 40 मिनिटे सेलिब्रेशन; व्हिडिओ व्हायरल
बुलढाण्यातील शेगाव येथील इंडियन ओव्हरसीज बँकेत शेतकरी, वृद्ध आणि इतर खातेदार पैसे काढण्यासाठी ताटकळत असताना कर्मचाऱ्यांनी शाखा व्यवस्थापकांच्या केबिनमध्ये तब्बल 40 मिनिटे वाढदिवस साजरा केल्याचा आरोप आहे. कार्यालयीन वेळेत झालेल्या या सेलिब्रेशनचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने संताप व्यक्त होत असून, संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.