विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराडवर आपल्या मुलाला अडकवण्यासाठी कारागृहातून कट रचल्याचा गंभीर आरोप करत कथित ऑडिओ क्लिप सादर केली आहे. त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते एकत्रित देण्याची मागणी केली. त्यामुळे बीडमध्ये हत्या प्रकरण आणि दुष्काळाच्या प्रश्नावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
मराठवाड्याच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना देणारी बीड-पुणे रेल्वे सेवा आज सुरू झाली. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी त्यांनी या प्रकल्पामागे अजित पवारांचे प्रयत्न असल्याचे सांगत बीड-पनवेल थेट रेल्वेसाठीही प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
बीडच्या केज तालुक्यातील विलास घुले हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. उमेश माने याच्याविरोधात एका महिलेने अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धमकावल्याची तक्रार दिल्यानंतर केज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या नव्या घडामोडीमुळे प्रकरणाचा तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.